CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके…

CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके…

| Updated on: Oct 10, 2026 | 9:31 AM

CJP च्या दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १५,००० दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलाच्या कंपन्या तैनात आहेत. आंदोलनाला परवानगी नसतानाही CJP ने आक्रमक भूमिका घेतली आहे, तर जंतरमंतर बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आले आहे. मुंबईतून अभिजीत दिपके दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

CJP च्या प्रस्तावित दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. आज जवळपास १५,००० दिल्ली पोलीस दिल्लीतील रस्त्यांवर तैनात आहेत, विविध ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीएसएफ, आयटीबीपी, आरएएफ तसेच इतर राज्यांमधील सुरक्षा यंत्रणांनाही पाचारण करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, CJP च्या आंदोलनाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, या विरोधात CJP ने आक्रमक पवित्रा घेतला असून, परवानगी नसली तरी आंदोलन करणार अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये असल्याचे चित्र आहे. जंतरमंतर परिसर संपूर्णपणे बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आला आहे, जेणेकरून आंदोलकांना तिथे पोहोचता येऊ नये. मुंबईहून अभिजीत दिपके दिल्लीकडे रवाना झाले असून, ते लवकरच दिल्लीत पोहोचतील अशी माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांची वाढती संख्या लक्षात घेऊन चोख बंदोबस्त ठेवला आहे.

 

Published on: Oct 10, 2026 9:31 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us