Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या लेकीला थेट मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच केला फोन, म्हणाले…

Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या लेकीला थेट मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच केला फोन, म्हणाले…

| Updated on: May 06, 2025 | 8:58 AM

यंदा बारावीच्या परिक्षेला मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बसली होती. तिला देखील ८५.११ टक्के इतके गुणे मिळाले आहेत. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे.

दिवंगत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख यंदा बारावीला होती. आपल्या आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवीनं या कठीण प्रसंगात चांगला अभ्यास करत बारावीच्या परिक्षेत मोठं यश मिळवले आहे. नुकताच काल (5 मे) बारावीचा निकाल लागला. यामध्ये वैभवीने 85.33% टक्के गुण मिळवल्याचे समोर आहे. त्यानंतर राज्यभरातून वैभवीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. राजकीय वर्तुळातील अनेक नेते मंडळी वैयक्तिकरित्या फोन करून तिचं कौतुक करत आहेत.

अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संतोष देशमुखांच्या लेकीला फोन करत बारावी परीक्षा अतिशय चांगले गुण मिळवत उत्तीर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, भविष्यात तुला जे काही शिकायचं असेल, पुढं जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण तू घे, आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वैभवीला आश्वासन दिले. तर सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखला पत्र सुद्धा लिहिले आहे. त्यात बारावीच्या तिच्या गुणांबद्दल अभिनंदन केले. बीडच्या अंबेजोगाईचे SDO दीपक वाजळे यांनी भेटून मुख्यमंत्र्यांचे हे पत्र वैभवीपर्यंत पोहोचवलं.

Published on: May 06, 2025 08:10 AM