Devendra Fadnavis : … त्यावर ठाकरेंचीच सही; इंग्रजी, हिंदी दुसरी भाषा म्हणून शिफारस, फडणवीसांनी सगळं सांगितलं

Devendra Fadnavis : … त्यावर ठाकरेंचीच सही; इंग्रजी, हिंदी दुसरी भाषा म्हणून शिफारस, फडणवीसांनी सगळं सांगितलं

| Updated on: Jun 30, 2025 | 8:14 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करण्यात येत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. मात्र त्यांनी यावेळी एक मोठी माहिती दिली.

इंग्रजी आणि हिंदी भाषेबद्दलची शिफारस ठाकरेंच्या नेत्याकडून करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विजय कदम यांनी ही शिफारस केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. इतकंच नाहीतर २०२१ मध्ये माशेलकर समितीकडून मुख्यमंत्री ठाकरेंना १०१ पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता. हा अहवाल सादर केला तेव्हा संजय राऊतही उपस्थित होते. या अहवालाच्या आठव्या प्रकरणात भाषेचा विषय आहे. यासाठी जो उपगट तयार करण्यात आला त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे विजय कदम यांचा समावेश होता. इंग्रजी, हिंदी दुसरी भाषा म्हणून पहिलीपासून लागू करावी, अशी विजय कदम यांची शिफारस होती. २० जानेवारी २०२२ रोजी मंत्रिमंडळात या अहवालाचं इतिवृत्त कायम केलं गेलं. या इतिवृत्तावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे. त्रिभाषा सूत्र मंजूर करणारी बैठक २० जानेवारी २०२२ रोजी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षेत पार पडली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Published on: Jun 30, 2025 08:13 AM