PM Modi @75th Birthday: मोदीजी सस्नेह नमस्कार… पंतप्रधानांना फडणवीसांकडून अनोख्या शुभेच्छा, बघा काय लिहिलं पत्र?

PM Modi @75th Birthday: मोदीजी सस्नेह नमस्कार… पंतप्रधानांना फडणवीसांकडून अनोख्या शुभेच्छा, बघा काय लिहिलं पत्र?

| Updated on: Sep 17, 2025 | 12:03 PM

मराठी भाषेला दिलेल्या अभिजात दर्जा आणि मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याच्या निर्णयाचा उल्लेख करून फडणवीसांना मोदींना अनोख्या शुभेच्छा देत सरकारच्या विविध योजना आणि राष्ट्रीय विकासातील योगदानाचे वर्णन केले आहे. चांद्रयान-3 ची यशस्वी मोहीम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचाही यात समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. फडणवीसांनी एका व्हिडिओ संदेशातून महाराष्ट्राकडून मोदींना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या संदेशात, मोदी सरकारच्या विविध योजना आणि देशाच्या विकासात त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयाबद्दल आणि मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याच्या पद्धतीचे कौतुक केले आहे. आत्मनिर्भर भारत, चांद्रयान-3 ची यशस्वी मोहीम, आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी केलेले प्रयत्न यांचे विशेष उल्लेख करण्यात आले आहेत. व्हिडिओ संदेशात, महाराष्ट्राच्या विकासात पंतप्रधानांच्या कार्याची सकारात्मक भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.

Published on: Sep 17, 2025 12:03 PM