CM Eknath Shinde Aurangabad Speech : 2019 ला शिवसेना भाजप सरकार का बनू शकलं नाही? एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा
हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे जात होतो. त्यामुळे जनतेने भाजपचे 106 आमदार आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून दिले. पण, नंतर काय झालं? काही लोकाची वक्तव्ये आली, आम्हाला अनेक दरवाजे मोकळे आहेत. ती कशाची सुरुवात होती? असा सवाल एकनाथ शिंदेंनी केलाय.
आमदार अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. त्यावेळी जाहीर सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही शिवसेना आणि भाजपने युती म्हणून निवडणूक लढवली होती. बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावला होता. हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे जात होतो. त्यामुळे जनतेने भाजपचे 106 आमदार आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून दिले. पण, नंतर काय झालं? काही लोकाची वक्तव्ये आली, आम्हाला अनेक दरवाजे मोकळे आहेत. ती कशाची सुरुवात होती? असा सवाल एकनाथ शिंदेंनी केलाय.
‘मी साक्षीदार आहे, शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडून आलो होतो. मी त्यावेळी उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करु. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो शोधण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. पण तसं झालं नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु झाली. तेव्हा आम्ही सगळे म्हणालो होतो, अशी आघाडी करु नका. पण, पक्षाचा आदेश ऐकायचा असतो, बाळासाहेबांची शिकवण आहे. नंतर आघाडी सरकार स्थापन झालं’, असा खळबळजनक खुलासा एकनाथ शिंदेंनी केलाय.
