खोके, मिंधे अन् गद्दार बोलणं कुठल्या कायद्यात बसतं?, सभागृहात मुख्यमंत्री म्हणाले…

| Updated on: Mar 24, 2023 | 2:00 PM

VIDEO | लोकशाही धोक्यात होती तर भारत जोडो यात्रा कशी काढली? मुख्यमंत्र्यांनी आक्रमक होत केली प्रश्नांची सरबत्ती

Follow us on

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील सभागृहात निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी असे म्हटले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणार असाल तर या देशातील जनता आणि आम्ही तो अपमान सहन करणार नाही. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. यासह सर्वांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले. यासह एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात मुख्यमंत्र्यांना खोके, मिंधे, चोर आणि गद्दार म्हणणं हे कुठल्या कायद्यात किंवा आचारसंहितेत बसतं हे सांगावं असा सवाल एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आमदार नाना पटोले यांना उपस्थित केला आहे. शिंदे म्हणाले आम्ही जोडे मारण्याचं समर्थन केलं नाही आणि करणारही नाही परंतु वीर सावरकरांचा वारंवार अपमान होणं किंवा अपमान करणं हे देशद्रोहाचे काम आहे. सावरकरांचा होणारा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले