Maharashtra Budget 2024 : औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार? शिंदेंचा कुणावर पलटवार?

Maharashtra Budget 2024 : औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार? शिंदेंचा कुणावर पलटवार?

| Updated on: Jun 28, 2024 | 5:50 PM

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली. विरोधकांच्या टीकेवर शिंदेंनी पलटवार केलाय.

जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने… आता चादर फाटली असल्याने सत्ताधाऱ्यांनी खैरात वाटायला सुरूवात केली असल्याचे म्हणत जयंत पाटील यांनी खोचक टीका केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार करत औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार? असा सवाल केला. “महिलांसाठी लाडकी लेक आणि लाडकी बहीण या योजना आणत असाल तर जरुर आणा. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीदेखील काही आणा”, उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. तर ‘आता जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना 10 हजार अप्रेंटीशीप महिन्याला देणार आहोत. त्यांना कौशल्य मिळाल्यानंतर चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील. आम्ही लाडका भाऊ योजना केली ना? पण त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय? म्हणून लाडका भाऊ देखील आम्ही घेतला. 10 हजार देतोय.’, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Published on: Jun 28, 2024 05:47 PM