कालीचरण महाराजांकडून महात्मा गांधींचा अपमान, अकोल्यात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

कालीचरण महाराजांकडून महात्मा गांधींचा अपमान, अकोल्यात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 10:05 AM

कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींचा अवमान केला आहे. त्याविरोधात आता काँग्रेस आक्रमक झाली असून, कालीचरण महाराज यांच्याविरोधात  कडक कारवाई करावी अशी मागणी अकोला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

अकोला: काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत एक तरुण साधू ‘शिवतांडव स्तोत्र’ गात होता. तरुण साधूचा आवाज, त्याची स्टाईल पाहून व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला. या साधूचे नाव आहे कालीचरण महाराज. याच कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींचा अवमान केला आहे. त्याविरोधात आता काँग्रेस आक्रमक झाली असून, कालीचरण महाराज यांच्याविरोधात  कडक कारवाई करावी अशी मागणी अकोला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.