मंत्र्याचा ताफा अडवला अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोयाबीन फेकलं… अमरावती, सोलापुरात बघा काय घडलं?

मंत्र्याचा ताफा अडवला अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोयाबीन फेकलं… अमरावती, सोलापुरात बघा काय घडलं?

| Updated on: Sep 26, 2025 | 5:41 PM

अमरावतीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत सोयाबीन फेकले. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन झाले. सोलापूर जिल्ह्यातील कारी गावात शेतकऱ्यांनी मंत्री भरत गोगावलेंचा ताफा रोखत प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी केली.

अमरावतीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ताफ्यावर सोयाबीन फेकण्यात आले. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन चव्हाणांच्या ताफ्याला आडवे गेले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेदरम्यान दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी झाली. भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या गाडीवरही सोयाबीन फेकण्यात आले.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील कारी गावात शेतकऱ्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या ताफ्याला रोखले. ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीपोटी प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. एका शेतकऱ्याने तर “शेतकऱ्यांची टिंगल लावली का?” असे म्हणत आपला संताप व्यक्त केला. भरत गोगावले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरांना भेट दिली असता, एका महिला शेतकऱ्याने आपल्या व्यथा मांडल्या.

Published on: Sep 26, 2025 05:41 PM