राहुल गांधी अन् पंतप्रधान मोदी ट्विट करतांना चुकले? शिवजयंतीला शिवरायांना ‘आदरांजली’ऐवजी वाहली ‘श्रद्धांजली’
महाराष्ट्रभर शिवजयंती उत्साहात साजरी झाली. शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा शिवजयंतीचा सोहळा पार पडला. पण शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधींनी केलेल्या ट्विटवरून राजकीय टीका टिपण्णी झाली. तर त्यानंतर काँग्रेसने सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी ही ट्विट करताना चुकल्याचं सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी झाली. जन्मभूमी किल्ले शिवनेरीपासून ते महाराष्ट्रातल्या शहरा शहरांमध्ये हा उत्साह पाहायला मिळाला. पण राहुल गांधींच्या एका ट्विटमुळे राजकीय वातावरण तापलं. कारण महाराजांच्या जयंती निमित्ताने ट्विट करताना राहुल गांधींनी श्रद्धांजली हा शब्द वापरला. त्यांचं ट्विट होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या साहसानं आणि शौर्यानं त्यांनी निर्भयतेने आणि संपूर्ण समर्पणान आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणास्त्रोत राहील. महाराजांना नमन करण्याचा राहुल गांधींचा भाव आहे. ध चा मा करून घाणेरडे राजकारण केल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसने ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटवरून आता मोदींनी सुद्धा माफी मागावी असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ट्विट होतं. यामध्ये होमेज या शब्दाला अंडरलाईन केले आहे. होमेज या शब्दांचा मराठीमध्ये अर्थ सुद्धा श्रद्धांजली असाच होतो. त्यामुळे अतुल लोंढे यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं, सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या एक्स पोस्टवर तमाम भाजपवाल्यांनी मोदींना माफी मागायाला लावावी. दरम्यान किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंतीचा सोहळा पार पडला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
