“मणिपूरमधील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा”, काँग्रेस आमदाराची मागणी
मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली आहे. शेतात नेऊन या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणावरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. यावरून आता महाराष्ट्र काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई, 21 जुलै 2023 | गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर मध्ये हिंसाचार सुरु आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली आहे. शेतात नेऊन या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणावरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. यावरून आता महाराष्ट्र काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “केंद्र सरकारने ताबडतोब मणिपूर सरकारला बरखास्त करावे. सर्व पक्षीय प्रतिनिधी मंडळ मणिपूरला पाठवावे. हा प्रश्न ताबडतोब सोडवावा तसेच त्या ठिकाणी शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. पंतप्रधान 2024 च्या निवडणुकीकडे बघतात. मत कशी वाढतील हा त्यांचा केंद्र बिंदू आहे.”
Published on: Jul 21, 2023 08:48 AM
