राहुल गांधी विरोधी घोषणाबाजीमुळे विधानसभा ठप्प; शेलारही झाले आक्रमक

| Updated on: Mar 23, 2023 | 1:22 PM

सत्ताधारी भाजपकडून विधानभवनाबाहेर राहूल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले

Follow us on

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. भाजपकडून राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तर या मागणीसाठीच सत्ताधारी भाजपकडून विधानभवनाबाहेर राहूल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याचदरम्यान सभागृहात देखील यावरून सत्ताधारी भाजप आक्रमक झालेला दिसला.

भाजप आमदार अशिष शेलार यांनी, सभागृहात आक्रमक पवित्रा घेत, राहुल गांधी यांनी देशाचा तर अपमान केलाच आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा देखील अपमान केला आहे. एक बाळासाहेब ठाकरे होते, ज्यांनी मनिशंकर अय्यर यांनी सावरकर यांचा अपमान केला त्याला पायतलं काढून महाराष्ट्रात जोडे मारो कार्यक्रम केला. मात्र हे जोडे मात्र घालण्याच्या लायकीचे नाहीत. हे सरकार विरोधी आहेत. राहुल गांधी यांनी माफी मागावी. बाळासाहेब थोरात तुमच्यात हिंमत असेल तर माफी मागा असे आवाहन शेलार यांनी केलं.