माझ्यासह अनेक नेत्यांचे कॉल रेकॉर्ड झाले - Nana Patole
नाना पटोलेंकडून कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित
Image Credit source: tv9

माझ्यासह अनेक नेत्यांचे कॉल रेकॉर्ड झाले – Nana Patole

| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 7:54 PM

माझ्यासह अनेक नेत्यांचे कॉल रेकॉर्ड झाले आहेत. कुणाच्या सांगण्यावरून हे झालं ते आम्हाला माहीत आहे त्यांच्यावर देखील कारवाई झाली आहे. अधिकारी असे बेकायदेशीर कृत्य कसे काय करू शकतात, असा सवाल पटोले यांनी केला आहे.

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात आपण कोर्टात जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी दिली. 500 कोटी रुपयांचा दावा ठोकणार आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नाना पटोले याचिका दाखल करणार आहेत. माझ्यासह अनेक नेत्यांचे कॉल रेकॉर्ड झाले आहेत. कुणाच्या सांगण्यावरून हे झालं ते आम्हाला माहीत आहे त्यांच्यावर देखील कारवाई झाली आहे. अधिकारी असे बेकायदेशीर कृत्य कसे काय करू शकतात, असा सवाल पटोले यांनी केला आहे.