Vijay Wadettiwar : पार्थ पवारांनंतर शिवसेनेच्या बड्या मंत्र्यानं 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा गौप्यस्फोटानंतर खळबळ

Vijay Wadettiwar : पार्थ पवारांनंतर शिवसेनेच्या बड्या मंत्र्यानं 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा गौप्यस्फोटानंतर खळबळ

| Updated on: Nov 08, 2025 | 11:05 AM

मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमध्ये 200 कोटी रुपये किमतीची जागा केवळ 3 कोटी रुपयांना स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी मिळवल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन दिले.

गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू होती. विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांनी पार्थ पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला. अशातच आता  काँग्रसे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मीरा-भाईंदर परिसरात सरनाईक यांनी 200 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली चार एकर जमीन केवळ 3 कोटी रुपयांना लाटल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. ही जमीन सरनाईक यांनी त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी घेतल्याचे म्हटले जात आहे. वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील सविस्तर माहिती लवकरच उघड करणार असल्याचे सांगितले. त्यांनी प्रश्न विचारला की, मंत्र्यांना स्वतःच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावावर इतक्या कमी किमतीत अशी जागा घेता येते का? जर असे व्यवहार होत असतील, तर हे महाराष्ट्राला लुटण्यासारखेच आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

Published on: Nov 08, 2025 11:05 AM