Anajali Bharti | अमृता फडणवीस यांच्यावर बोलताना प्रसिद्ध गायिकेची जीभ घसरली; ठाकरे सेनेच्या महिला नेत्याकडून कारवाईची मागणी

Anajali Bharti | अमृता फडणवीस यांच्यावर बोलताना प्रसिद्ध गायिकेची जीभ घसरली; ठाकरे सेनेच्या महिला नेत्याकडून कारवाईची मागणी

| Updated on: Jan 27, 2026 | 1:45 PM

भंडाऱ्यात 13 जानेवारी रोजी झालेल्या भीम मेळाव्यात गायिका अंजली भारती यांनी बालिकांवरील बलात्कार आणि अत्याचारांवर तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी अंजली भारती यांची जीभ घसरली. यावेळी अंजली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नाव घेत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध नोंदवला आहे.

भंडाऱ्यात 13 जानेवारी रोजी झालेल्या भीम मेळाव्यात गायिका अंजली भारती यांनी बालिकांवरील बलात्कार आणि अत्याचारांवर तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी अंजली भारती यांची जीभ घसरली. यावेळी अंजली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नाव घेत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध नोंदवला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही ट्विटद्वारे या विधानाचा निषेध नोंदवला आहे. संविधानात प्रत्येकाचा आदर करा हे पण एक कलम आहे आणि हे जर अंजली भारती विसरत असतील तर त्यांच्यावर कायदयानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करतानाच इतक्या खालच्या पातळीवर येऊन कुठल्याच महिलेने बोलू नये, असं आवाहनही पेडणेकर यांनी केलं आहे. मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jan 27, 2026 01:45 PM