NCP Ajit Pawar : पुण्यात गुन्हेगारांना तिकीट अन् अजित पवार यांची सारवासारव, दादांनी सचिन खरात यांच्यावर ढकललं!
पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गुंड आणि हत्या प्रकरणातील आरोपींना उमेदवारी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. अजित पवारांनी यावर बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) सोबतच्या युतीचा हवाला दिला, व तिकीट वाटपाचा निर्णय खरात गटाचा असल्याचे म्हटले. यामुळे भाषणातील आणि कृतीतील फरकावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे, पक्ष्याकडून गुंड आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपींना तिकीट देण्यात आल्याचे आरोप आहेत. यामध्ये आयुष कोमकर हत्या प्रकरणातील लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर, तसेच कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांचा समावेश आहे. यावर अजित पवारांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) सोबतच्या युतीचा दाखला देत, काही जागा खरात गटासाठी सोडल्या होत्या आणि त्यांनीच उमेदवारांची निवड केली, असे म्हटले. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उमेदवार लढत असले तरी, उमेदवारीचा अंतिम निर्णय खरात गटाचा होता, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणावरून अजित पवारांच्या पूर्वीच्या गुन्हेगारांविरोधातील भूमिका आणि सध्याच्या कृतीमध्ये फरक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
