मास्कचा वापर कमी झाल्याने देशावर कोरोना संकट, केंद्रीय टास्क फोर्सचा इशारा

| Updated on: Dec 11, 2021 | 11:19 AM

कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतामध्ये देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.  या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आव्हान केंद्रीय टास्क फोर्सकडून करण्यात आले आहे.

Follow us on

मुंबई –  कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतामध्ये देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.  या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आव्हान केंद्रीय टास्क फोर्सकडून करण्यात आले आहे. नियमित मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर  करा आणि सोशल डिन्स्टसिंगचे पालन करा असे आवाहन टास्क फोर्सकडून करण्यात आले आहे. तसेच भारतामध्ये मास्कचा वापक कमी झाला आहे, मास्कचा वापर न केल्यास पुन्हा एकदा देशावर कोरोना संकट येऊ शकते, असा इशारा देखील देण्यात आला आहे.