VIDEO : नाशिक शहर सोमवारपासून कोरोना निर्बंधातून मुक्त होण्याची शक्यता | Nashik Corona Update

VIDEO : नाशिक शहर सोमवारपासून कोरोना निर्बंधातून मुक्त होण्याची शक्यता | Nashik Corona Update

| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 2:58 PM

राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीतील कोरोना निर्बंध हटवावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. दुसऱ्या लाटेत तर हजारो जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.

राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीतील कोरोना निर्बंध हटवावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. दुसऱ्या लाटेत तर हजारो जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. आपल्या जीवलगांना वाचवण्यासाठी ऑक्सिजन हवा म्हणून कित्येक कुटुंब रस्त्यावर रांगेत उभे राहिले. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर गेली आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. मृत्यू थांबले आहेत, पण जिल्ह्यातील कोरोना निर्बंध कायम आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यापासून ते राजकीय कार्यक्रमही अवघ्या पन्नास टक्के उपस्थितीत पार पाडावे लागत आहेत. त्यामुळे हे निर्बंध तातडीने उठवावेत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. राज्य सरकार यावर सकारात्मक असल्याचे समजते. येत्या सोमवारपासून नाशिक महापालिका हद्दीत तरी निर्बंध उठू शकतात, अशी चर्चा आहे.

Published on: Mar 17, 2022 02:57 PM