देशातील पहिली खासगी ट्रेन शिर्डीत दाखल

देशातील पहिली खासगी ट्रेन शिर्डीत दाखल

| Updated on: Jun 16, 2022 | 9:54 AM

देशातील पहिली खासगी ट्रेन शिर्डीमध्ये आज सकाळी दाखल झाली आहे. या ट्रेनला एकूण वीस डबे असून, या ट्रेनची प्रवासी क्षमता दीड हजार इतकी आहे.

भारत गौरव योजनेंतर्गत देशात पहिली खासगी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन मंगळवारी कोईम्बतूरमधून शिर्डीच्या दिशेने निघाली होती. आज सकाळी साडेसहा वाजता ही ट्रेन शिर्डीमध्ये पोहोचली आहे. या ट्रेनला एकूण वीस डबे असून, दीड हजार प्रवासी वाहतूक क्षमता आहे. ही ट्रेन महिन्यातून तीनदा धावणार आहे.

 

Published on: Jun 16, 2022 09:54 AM