Manoj Jarange Patil :  तरी मी जाणारच… मुंबईत आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई असताना जरांगेंचा निर्धार कायम

Manoj Jarange Patil : तरी मी जाणारच… मुंबईत आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई असताना जरांगेंचा निर्धार कायम

| Updated on: Aug 26, 2025 | 3:49 PM

हाय कोर्टानं परवानगी नाकरल्यानंतर आता जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना कोर्टाच्या निर्णयानंतर जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत आणि लोकशाही पद्धतीने करण्यात येणारं आंदोलन कधीही रोखता येत नाही. सरकारने गोर गरिबाच्या भावनांशी खेळू नये, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. तर नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं पण आझाद मैदानावर नाही, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे.  मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या आदेशावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे ते असेही म्हणाले की, मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी नाकारली जाते आणि नवी मुंबई खारघर इथे परवानगी दिली जाते. मग आझाद मैदानावर काय प्रॉब्लेम आहे? न्यायालयाचा सन्मान करणारे लोकं आहोत. कायद्याच्या नियमात राहून अर्ज करून परवानगी मागितली आहे. त्यामुळे शंभर टक्के आम्हाला न्यायालयाकडून परवानगी मिळणार, असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला.

Published on: Aug 26, 2025 03:44 PM