महायुतीसह मविआत इच्छुकांची गर्दी, कोण आघाडीवर तर कुठे रस्सीखेच?
लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची गर्दी होत असून अनेक ठिकाणी जागांचा पेच फसल्यानं रस्सीखेच सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपच लढणार असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं. आणि जागावाटपाचे अधिकार शिंदेंना असल्याचे उत्तर उदय सामंत यांनी दिलंय.
मुंबई, १ मार्च २०२४ : लोकसभेचं घोडा मैदान जवळ येत असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची गर्दी होत असून अनेक ठिकाणी जागांचा पेच फसल्यानं रस्सीखेच सुरू आहे. कुणाला कुठे लागू शकते लॉटरी आणि कोणाचा होणार पत्ता कट? दरम्यान, या इच्छुकांची गर्दीमध्ये दावे-प्रतिदावे रंगत असून इच्छुक उमेदवारांच्या गर्दीत महाविकास आघाडीहून महायुतीमध्ये जास्तच रस्सीखेच सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपच लढणार असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं. आणि जागावाटपाचे अधिकार शिंदेंना असल्याचे उत्तर उदय सामंत यांनी दिलंय. गेल्यावर्षी २०१९ विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये १ लाख ७८ हजार मतांनी विनायक राऊतांनी निलेश राऊतांचा पराभव केला होता. दरम्यान नगर लोकसभेच्या जागेसाठीही महायुतीत मोठी चुरस दिसतेय. बघा स्पेशल रिपोर्ट कोणी कुठे सांगितला दावा?
