Dadar Kabutarkhana : मी डॉक्टरांना मुर्ख मानतो, कैवल्यरत्न महाराजांचं कबुतर बचाओ धर्मसभेत वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?
दादर येथील धर्मसभेत कैवल्यरत्न महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांनी डॉक्टरांना मूर्ख संबोधले, त्यांच्या वक्तव्यांमुळे वैद्यकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा आणि वादाची शक्यता निर्माण झाली आहे.
दादर येथील एका धर्मसभेमध्ये कैवल्यरत्न महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. कबुतरखान्यासंदर्भात वाद सुरू असताना एखादा दुसरा व्यक्ती मेल्याने काय होते? असा प्रश्न कैवल्यरत्न महाराजांनी उपस्थित केलाय. इतकंच नाहीतर कैवल्यरत्न महाराज हे डॉक्टरांना मूर्ख मानत असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे वैद्यकीय क्षेत्राकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. कबूतर बचाओ धर्मसभेत कैवल्यरत्न महाराजांनी हे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले.
कैवल्यरत्न महाराज यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादाची शक्यता निर्माण झाली आहे. दादरमधील कबुतरखान्याजवळील धर्मसभेत कैवल्यरत्न महाराजसह धर्मानंद महाराज यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केल्याचे पाहायला मिळाले. आम्ही धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला, म्हणूनच देवेंद्र फडणवीस सत्तेत आले, असं वक्तव्य केले. यानंतर वाद पेटण्याची शक्यता आहे.
