Ajit Pawar : आता खरी लढाई… मुंबई महापालिका निवडणुकीवर अजित पवारांचं मोठं भाष्य

Ajit Pawar : आता खरी लढाई… मुंबई महापालिका निवडणुकीवर अजित पवारांचं मोठं भाष्य

| Updated on: Jun 10, 2025 | 6:21 PM

मुंबईत प्रत्येक वॉर्डाची निवडणूक होईल. दुसरीकडे चारचार वॉर्ड राहण्याची शक्यता आहे. वॉर्ड कितीचा असावा याबद्दल प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात. आपल्याला बहुजनांचा आदर करून पुढे जायचं आहे. पुणे पिंपरी चिंडवडमध्ये १० लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नाशिकमध्ये पाच लाख झाली पाहिजे, असे निर्देश अजित पवारांनी दिले.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या महापालिका निवडणुकीवर त्यांनी भाष्य केलं आहे. पुण्यात बोलत असताना अजित पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जोमात कामाला लागावं लागेल. चार महिने बाकी आहेत. मुंबईत वॉर्डवाइज निवडणूक होईल. कसेही वॉर्ड पडू द्या. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची आहे. आपण जोमाने काम करायचं असल्याचे दादा म्हणाले.

तर सदस्य नोंदणीवर बोलताना अजित पवार म्हणाले, एक कोटीचं टार्गेट आपण ठेवलं आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या. प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडा. तुम्ही लोकांशी संपर्क करा. आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यात आहे. २८ महापालिका, २५ जिल्हा परिषद, २८५ पंचायत समित्या, अनेक नगरपंचायतीच्या निवडणुका आहे. आम्हाला आमदारकी, खासदारकी मिळाली. कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आमदार, मंत्री, खासदार झालो त्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली पाहिजे, असेही पवार म्हणाले.

Published on: Jun 10, 2025 06:21 PM