Ajit Pawar : सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतल्या कार्यक्रमस्थळी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. काळी सातच्या अगोदर त्यांनी बारामतीतल्या कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. बारामती नगरपरिषदेच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन पार पडलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. काळी सातच्या अगोदर त्यांनी बारामतीतल्या कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. बारामती नगरपरिषदेच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन पार पडलं. नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलाची अजित पवार यांनी माहिती घेतली. काम दर्जेदार करण्याबाबत अधिकारी आणि ठेकेदारांना सुचना केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशिन वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सहारा फाउंडेशनच्या वतीने शिलाई मशिन वाटप करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे वाटप झालं. मुस्लिम बॅंकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होता.
