राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? अजित पवार यांची राष्ट्रवादी पेचात

राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? अजित पवार यांची राष्ट्रवादी पेचात

| Updated on: Jun 13, 2024 | 12:06 PM

राज्यसभेवर खासदार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झालं पण अचानक छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार की भुजबळ यावरून अजित पवार यांची राष्ट्रवादी पेचात पडली आहे. अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्यामध्ये तासभर बैठक झाली. काय झालं या बैठकीत बघा...

राज्यसभेवर खासदार कोण होणार? अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ…याचा फैसला लवकरच होणार आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झालं पण अचानक छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार की भुजबळ यावरून अजित पवार यांची राष्ट्रवादी पेचात पडली आहे. अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्यामध्ये तासभर बैठक झाली. बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं पण त्याचवेळी छगन भुजबळ यांचा फोन आला. राज्यसभेसाठी आपणही इच्छुक असल्याचं भुजबळांनी सांगितल्याचं सूत्रांकडून समजतंय. यानंतर पुन्हा अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे आता लवकरच अंतिम नाव निश्चित होणार असल्याची चिन्ह आहेत.

Published on: Jun 13, 2024 12:06 PM