देवेंद्र फडणवीसांचं सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून मोठं विधान, जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करणार?

देवेंद्र फडणवीसांचं सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून मोठं विधान, जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करणार?

| Updated on: Jun 13, 2024 | 10:49 AM

मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून कार्यवाही सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी नेत्यांशी बोलणार असून त्यांचंही नुकसान होणार नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे अधिवेशापूर्वीच हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून कार्यवाही सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी नेत्यांशी बोलणार असून त्यांचंही नुकसान होणार नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे अधिवेशापूर्वीच हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची कायद्यात रूपांतर करा, अशी मागणी आहे. तसंच झाल्यास ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली आहे. त्या कुणबी नोंदींच्या आधारे गणगोताच्या सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र अर्थात ओबीसीतून आरक्षण मिळेल. त्यासाठीच मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट.. उपोषणाच्या पाचव्या दिवशी कोणत्या राजकीय नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट?

Published on: Jun 13, 2024 10:49 AM