MSRTC : मोठी बातमी, ‘लालपरी’चा प्रवास आता स्वस्त, ‘तो’ निर्णय मागे, शिंदेंची मोठी घोषणा काय?
MSRTC Rent hike 30 percernt cancelled : एसटी बसेसची ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आल्याच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून दिलासा मिळाला आहे. मात्र एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.
गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवासी आणि चाकरमान्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एकेरी गट ( एका दिशेचे ) आरक्षणावर जाहीर केलेली ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि मुंबई तसेच उपनगरातील प्रवाशांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भाडेवाढ रद्द करण्याच्या सूचना दिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. अलीकडेच राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या भाड्यामध्ये ३० टक्के वाढ केली होती त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भाडेवाढ रद्द केल्याची आज पंढरपुरात जाहीर केले.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एकेरी गट ( एका दिशेचे ) आरक्षणावर करण्यात आलेली ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे, कारण यावर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात हस्तक्षेप करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ही भाडेवाढ त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिले.
