Eknath Shinde : शिंदे पहिल्यांदाच भाजपवर गरजले, थेट म्हणाले अहंकाराविरोधात… महायुतीत खदखद उघड!

Eknath Shinde : शिंदे पहिल्यांदाच भाजपवर गरजले, थेट म्हणाले अहंकाराविरोधात… महायुतीत खदखद उघड!

| Updated on: Nov 22, 2025 | 5:10 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड आणि डहाणू येथील प्रचारसभांमध्ये एकाधिकारशाही आणि अहंकाराविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. रावणाच्या अहंकाराचे उदाहरण देत, अहंकाराने लंकेचा नाश झाल्याचे त्यांनी सांगितले आणि मतदारांना २ तारखेला तेच काम करण्याचे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड आणि डहाणू येथील प्रचारसभांमध्ये जोरदार टीका केली. एकाधिकार शाही आणि अहंकाराविरोधात आपण आता एकत्र आलो आहोत, असे म्हणत खोचक भाष्यही भाजपवर यावेळी शिंदेंनी केली.  एकनाथ शिंदे यांनी मतदारांना एकाधिकारशाही आणि अहंकार यांच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. डहाणू येथील सभेत बोलताना शिंदे यांनी रावणाच्या अहंकाराचे उदाहरण दिले. रावणाच्या अहंकारामुळे त्याची लंका जळून खाक झाली, असे सांगत त्यांनी २ तारखेला मतदारांनी असेच काम करावे असे आवाहन केले. त्यांचा हा संदेश अहंकारी शक्तींना पराभूत करण्याच्या उद्देशाने होता.

Published on: Nov 22, 2025 05:10 PM