Eknath Shinde : शिंदे सेनेचा कोथळा शहाच काढणार… राऊतांच्या वक्तव्यावर सवाल करताच शिंदेंनी हातच जोडले अन् म्हणाले…

Eknath Shinde : शिंदे सेनेचा कोथळा शहाच काढणार… राऊतांच्या वक्तव्यावर सवाल करताच शिंदेंनी हातच जोडले अन् म्हणाले…

| Updated on: Dec 01, 2025 | 2:35 PM

संजय राऊत यांच्या शाह कोथळा काढणार या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर देणे टाळत राऊतांच्या तब्येतीला शुभेच्छा दिल्या. पालिका निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर आधारित असून विकास हाच प्रचाराचा मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने रद्द केलेल्या निवडणुकांबद्दल माहिती घेऊन बोलणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच माध्यमांशी बोलताना विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच काढणार असं म्हणत निशाणा साधला. तर  राऊतांनी शाह कोथळा काढणार या केलेल्या वक्तव्यावर शिंदे यांनी थेट भाष्य करणे टाळले. राऊत यांना त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा देत त्यांनी या विषयाला बगल दिली.

यासह एकनाथ शिंदे यांनी सध्या होणार असलेल्या निवडणुकांना स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या निवडणुका असे संबोधले. या निवडणुका स्थानिक समस्या आणि प्रश्नांवर आधारित असल्याने यात राजकीय भाषणांची आवश्यकता नसल्याचे त्यांनी नमूद केले. आपला प्रचार विकासावर आधारित असून डेव्हलपमेंट हाच मुख्य मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने रद्द केलेल्या निवडणुकांबद्दल बोलताना शिंदे यांनी चिंता व्यक्त केली. एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या थांबवल्या जात नाहीत, असे ते म्हणाले. यावर सविस्तर माहिती घेऊन नंतर बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीमधील समन्वयाच्या प्रश्नावर त्यांनी आरोप-प्रत्यारोप करत नसल्याचे म्हटले.

Published on: Dec 01, 2025 02:30 PM