आदित्य ठाकरे यांच्या पोटाची दीपक केसरकर यांना काळजी

| Updated on: Jan 14, 2023 | 6:00 PM

ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर भाजप, दुसऱ्या क्रमांकावर बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे शेवटच्या क्रमांकावर आलेल्या ठाकरे गटाने धसका घेतला आहे.

Follow us on

नवी दिल्ली : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ( ADITYA THACKAREY ) यांनी मुंबईतील रस्ते कामाच्या टेंडरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ( DIPAK KESARKAR ) यांनी उत्तर दिले आहे.

कोस्टल रोडवर मार्केट रेटच्या बरोबर रेट आणले. दर्जेदार काम व्हावं म्हणून निर्णय घेतला आहे. देशात सर्वोत्कृष्ट काम केलेल्या चांगल्या एजंसीला काम दिले. पण, मुंबई खड्डेमुक्त झाली तर आपले काय होणार असा प्रश्न काही जणांना पडला आहे, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

मुंबईत चांगले दवाखाने होत आहेत. चांगले सौदर्यीकरण होत आहे. जीवन बदलत आहे. हे सर्व चांगले बदल झाले तर आमचं काय होणार. हा विचार तुम्हाला पिळतोय. म्हणून तुमची ही आदळ आपट चालली आहे. अशी टीका त्यांनी केली.