MNERGA Protest : जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा नाम रहेगा… ‘मनरेगा’विरोधात संसद भवनाबाहेर आंदोलन

MNERGA Protest : जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा नाम रहेगा… ‘मनरेगा’विरोधात संसद भवनाबाहेर आंदोलन

| Updated on: Dec 16, 2025 | 5:46 PM

राज्यांमध्ये युती करण्याच्या शहांच्या सूचनांनंतर मनरेगा नामबदलाविरोधात विरोधकांनी संसद भवनाबाहेर आंदोलन केले. तर दुसरीकडे दिल्लीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली.

दिल्लीतील संसद भवनाबाहेर विरोधकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. मनरेगाचे नाव बदलल्यामुळे विरोधकांनी हे आंदोलन छेडले. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा नाम रहेगा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या भेटीत तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये जिथे युती करणे शक्य असेल, तिथे युती करण्याच्या सूचना शहांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाण्यास अमित शहांना हरकत नसल्याचेही सूत्रांकडून समजते. याशिवाय, उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहितीही मिळत आहे.

Published on: Dec 16, 2025 05:46 PM