Ahilyanagar : मुस्लिम धर्मगुरुंचं नाव रोडवर लिहून विटंबना, मुस्लिम समाज आक्रमक अन् तणावाचं वातावरण, अहिल्यानगरात काय घडलं?

Ahilyanagar : मुस्लिम धर्मगुरुंचं नाव रोडवर लिहून विटंबना, मुस्लिम समाज आक्रमक अन् तणावाचं वातावरण, अहिल्यानगरात काय घडलं?

| Updated on: Sep 29, 2025 | 12:49 PM

अहिल्यानगर संभाजीनगर रोडवरील कोटला गावात अज्ञात व्यक्तींनी मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाच्या विटंबनेची घटना घडवली. या घटनेनंतर मुस्लिम समाजाने संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन केले. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले आहे

अहिल्यानगर, संभाजीनगर रोडवरील कोटला गावात एका मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाच्या विटंबनेची गंभीर घटना समोर आली आहे. अज्ञातांनी रोडवर मुस्लिम धर्मगुरूंचे नाव लिहून विटंबना केली, ज्यामुळे मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त झाला. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने नगर-संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. कोटला परिसरात मुस्लिम तरुण आक्रमक झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहेत. सुमारे एक तासाहून अधिक काळ हे आंदोलन सुरू होते, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असून, या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Published on: Sep 29, 2025 12:49 PM