Devendra Fadnavis | पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं! म्हणाले, मी त्यांना बिनडोकच म्हणीन….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी दिलेल्या इंधन बचत आणि काटकसरीच्या आवाहनाची राज्य सरकारकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विधान भवनात मोटरसायकलने पोहोचल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निर्देश देशहितासाठी आहेत. आम्ही आपापल्या पातळीवर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. नेते मंडळी जेव्हा स्वतः कृती करतात, तेव्हा त्याचा संदेश थेट लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळेच मी स्वतः मोटरसायकलने आलो.”

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकारने मंत्र्यांच्या वाहन ताफ्यात कपात केली असून, सर्वांचे परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत. इंधन बचत आणि परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “साताऱ्यातील उद्याचा शासकीय कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने तो रद्द करण्यात आलेला नाही. मात्र पुढील सहा महिन्यांत शासनाकडून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही,” अशी घोषणाही त्यांनी केली.
दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “विरोधी पक्षाने प्रगल्भता दाखवण्याची गरज आहे. जगातील अनेक देश यापेक्षाही कठोर निर्णय घेत आहेत. पंतप्रधानांनी फक्त थोडासा त्याग करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर गदारोळ करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले. इतिहासाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, इंदिरा गांधी, नरसिंहराव सरकार तसेच 2012 मध्ये पी. चिदंबरम यांनीही अशा उपाययोजना राबवल्या होत्या. त्यामुळे आज विरोधकांनी दुटप्पी भूमिका घेणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी परदेश दौऱ्यावर होत असलेल्या टीकेवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “देशाच्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा मूर्खपणाचा कळस आहे. पंतप्रधानांचे दौरे हे देशाच्या रणनीतिक संबंधांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असतात,” असे ते म्हणाले.
तसेच, “पंतप्रधानांनी अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले आहे. एखाद्या व्यापाऱ्याने परदेशातील मोठी डील रद्द करावी असा त्याचा अर्थ नाही. अशा प्रकारची टीका करणारे लोक बिनडोक आहेत,” अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.