Devendra Fadnavis | पंचनामे राहू द्या, अगोदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा : देवेंद्र फडणवीस
ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली. मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.
Published on: Oct 01, 2021 12:12 PM