मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर

मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर

| Updated on: Aug 09, 2026 | 2:42 PM

कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या कारणांसाठी आलेले हे नेते एकत्र प्रवास करताना दिसल्याने या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.

कोल्हापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकाच विमानातून प्रवास करताना दिसले. या प्रवासाचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

आपल्या मतदारसंघातील कामानिमित्त जयंत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आणि संबंधित कार्यक्रमांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांचा एकत्र विमान प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे.

राहुल नार्वेकर, जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून प्रवास करत असल्याचे समोर आले. यामुळे या प्रवासादरम्यान नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, कोणते मुद्दे चर्चिले गेले, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या प्रवासामागे कोणतीही राजकीय चर्चा झाली का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या कारणांसाठी आलेले हे नेते एकत्र प्रवास करताना दिसल्याने या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात याबाबत कोणती प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 09, 2026 2:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us