मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुंबईत महत्त्वाची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मुंबईतील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः मुंबई-वाढवण एक्सप्रेस-वे कनेक्टिव्हिटी आणि उत्तण-विरार सी-लिंक हे प्रमुख विषय होते.

CM फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे उत्तण-विरार सी-लिंक प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली. तसेच, मुंबई-वाढवण एक्सप्रेस-वे कनेक्टिव्हिटीच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर आवश्यक परवानग्यांसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून त्वरित मंजुरी मिळावी अशी विनंतीही त्यांनी केली. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुंबई-वाढवण एक्सप्रेस-वेमुळे मुंबई आणि वाढवण बंदरादरम्यान वाहतूक अधिक सुलभ होईल, तर उत्तण-विरार सी-लिंकमुळे उत्तर मुंबई आणि पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील वाहतुकीचा ताण कमी होईल. या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यास राज्याच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. या बैठकीमुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग येण्याची शक्यता आहे.