पुण्यातील कार्यक्रम रद्द, मी दिवसभर घरीच, देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

पुण्यातील कार्यक्रम रद्द, मी दिवसभर घरीच, देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 6:27 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस सागर या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. भाजपनं बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस सागर या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. भाजपनं बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती. रश्मी शुक्ला यांचे विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विभागाची बैठक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सागर या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखाील याबाबत एक ट्विटकरुन पुण्यातील उद्याचे कार्यक्रम रद्द केल्याचं सांगितलं आहे.