CM अधिवेशनात आले नाहीत यावर आक्षेप नाही, मात्र त्यांनी जबाबदाऱ्या वाटायला हव्यात – Devendra Fadnavis

CM अधिवेशनात आले नाहीत यावर आक्षेप नाही, मात्र त्यांनी जबाबदाऱ्या वाटायला हव्यात – Devendra Fadnavis

| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 8:11 PM

आमचं सरकार असताना एखादा मंत्री आजारपणामुळे सभागृहात उपस्थित राहू शकला नाही तर आम्ही त्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांनी जबाबदाऱ्यांचं वाटप करावं’, असा सल्ला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पाठीच्या मणक्यासंदर्भात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रत्यक्षपणे कुठल्याही कार्यक्रमात किंवा कामकाजात सहभागी होत नाहीत. आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनातही (Winter Session) मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील नेत्यांकडून जोरदार टीका केली जातेय. अशावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरुन टीका करण्यात येत आहे. त्याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला. तावर बोलताना ‘माननीय मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असेल आणि ते येत नाहीत म्हणून आक्षेप घेणं बरोबर नाही. तब्येत खराब असेल त्यामुळे ते आले नाहीत तरीही आम्ही अधिवेशन पार पाडू. आमचं म्हणणं एवढंच आहे की कामकाज व्हावं. आमचं सरकार असताना एखादा मंत्री आजारपणामुळे सभागृहात उपस्थित राहू शकला नाही तर आम्ही त्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांनी जबाबदाऱ्यांचं वाटप करावं’, असा सल्ला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.