Dhananjay Munde | ‘काहीही करा पण शरद पवारांचा नाद करु नका’, मी फडणवीसांना सांगितलं होतं : धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुमासदार शब्दात टीका केली. देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. काहीही करा पण पवार साहेबांचा नाद नाही करायचा, असं मी त्यांना सांगितलंय, असे मुंडे मिश्किलपणे म्हणाले.
ष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या सोहळ्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुमासदार शब्दात टीका केली. देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. काहीही करा पण पवार साहेबांचा नाद नाही करायचा, असं मी त्यांना सांगितलंय, असे मुंडे मिश्किलपणे म्हणाले.
