मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी… सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरेंना 500 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे. कलानगर येथील मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर ठाकरेंच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारली. ठाकरेंनी सात दिवसांत जाहीर माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा दाखल केला जाईल, अशी मागणी साळियन यांच्या वकिलांनी केली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. सतीश सालियान यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना 500 कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजावली आहे. कलानगर येथील मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारली. सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी ही नोटीस बजावली असून, यामध्ये आदित्य ठाकरे यांनी सात दिवसांच्या आत जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. जर ठाकरे यांनी माफी मागितली नाही, तर 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला जाईल,
असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. सीबीआयने जेव्हा दिशा सालियान प्रकरणात गुन्हा दाखल केला, तेव्हा अज्ञात आरोपींमध्ये काही नावांचा उल्लेख होता, ज्यात आदित्य ठाकरे यांचाही समावेश होता. यानंतर आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमुळे आपली बदनामी झाली असल्याचा आक्षेप सतीश सालियान यांनी घेतला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे.
