Hingoli Video : जरांगेंबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट नेमकी काय? ज्यामुळं दोन गटात तुफान राडा, बघा व्हिडीओ
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे दोन गटांमध्ये तीव्र वाद झाला असून, पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर कुरूंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या भेंडेगाव गावात मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या आक्षेपार्ह माहितीमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाली. या पोस्टमुळे दोन गटांमध्ये वाद झाला आणि परिस्थिती चिघळली. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी आणि मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी या प्रकरणी व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर कुरूंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची अधिक तपासणी सुरू आहे.
Published on: Sep 19, 2025 11:44 AM
