Draupadi Murmu | द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ, मुर्मूंचे कुटुंब ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार

Draupadi Murmu | द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ, मुर्मूंचे कुटुंब ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार

| Updated on: Jul 25, 2022 | 11:07 AM

ओडिशातील द्रौपदी मुर्मू या आदिवासी नेत्या आहेत. 2002-2004 दरम्यान युती सरकारच्या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणूनही काम केलं आहे. आमदार म्हणूनही मुर्मू निवडून आल्या आहेत.

नवी दिल्लीः  देशाचे 15 वे राष्ट्रपती (Indian President) म्हणून यांनी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज संसद भवनात शपथ घेतली. सव्वा दहा वाजेच्या सुमारास देशाचे सर न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (N V Ramanna) यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. द्रौपदी मुर्मू यांचे कुटुंब ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील आहे. ओडिशातील त्या आदिवासी नेत्या आहेत. 2002-2004 दरम्यान युती सरकारच्या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणूनही काम केलं आहे. ओडिशातील रायरंगपूर हा त्यांचा मतदार संघ असून तेथून त्या आमदार म्हणूनही निवडून आल्या होत्या. आजच्या शपथविधी सोहळ्यात द्रौपदी मुर्मू यांची मुलगी इतिश्री आणि त्यांचे जावई गणेश हेम्ब्रम यासह त्यांचा भाऊ आणि वहिनी एवढे चारच नातेवाईक उपस्थित होते.

Published on: Jul 25, 2022 11:07 AM