मोठी बातमी! संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार? जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका

मोठी बातमी! संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार? जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका

| Updated on: Aug 04, 2023 | 10:09 AM

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली. संजय राऊत आणि प्रवीण राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ईडीने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई, 04 ऑगस्ट 2023 | मुंबईतील पत्राचाळ कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या याचिकेत ईडीने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला. प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यापर्यंत पैसा पोहोचला. प्रवीण राऊत संजय राऊतांचे फ्रंट मॅन, असल्याचा आरोप ईडीने आरोप पत्रात दाखल केला आहे. ईडीच्या आरोपांवर संजय राऊत यांच्या वकिलांचा मात्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

 

 

 

 

Published on: Aug 04, 2023 10:09 AM