Anil Parab | अनिल परबांना ईडीची नोटीस, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

Anil Parab | अनिल परबांना ईडीची नोटीस, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 8:40 PM

सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. कोरोना काळात कोट्यवधी रुपये खर्चून अनिल परब यांनी समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी खरेदी करुन साई रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांना यापूर्वी लक्ष्य केलेलं आहे. त्यांनी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचार तसेच गैरव्यवहाराचे आरोप केलेले आहेत. सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. कोरोना काळात कोट्यवधी रुपये खर्चून अनिल परब यांनी समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी खरेदी करुन साई रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच अनिल देशमुख 100 कोटी रुपये वसुली प्रकरण समोर आल्यानंतरही पुढचा नंबर हा अनिल परब यांचाच आहे, असे सोमय्या वेळोवेळी सांगत आलेले आहेत. तसेच परिवहन विभागातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्या तसेच भाजपने केलेला आहे.