ते महायुतीत मिठाचा खडा टाकताय! शिंदेंकडून अमित शाहांकडे भाजप प्रदेशाध्यक्षांची तक्रार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांविरोधात तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे. चव्हाण महायुतीत मिठाचा खडा टाकत असून बंडखोरांना आर्थिक पाठबळ देत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, या सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांविरोधात तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचे आणि ते पक्षप्रवेशासाठी पैशाचा गैरवापर करत असल्याचे शिंदे यांनी शहांना सांगितले. महायुतीविरोधातील बंडखोरांना चव्हाण आर्थिक पाठबळ देत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची जवळपास ५० मिनिटे चर्चा झाली. चव्हाणांकडून असेच सुरू राहिल्यास निवडणुकीत महायुतीला नुकसान होईल, अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केली.
Published on: Nov 20, 2025 10:31 AM
