निधीवरून दादा-शिंदेंमध्ये पडद्यामागे संघर्ष, अजित पवारांच्या अर्थ खात्यावर शिवसेनेचा वॉच? मंत्रालयात नेमकं घडलं काय?

निधीवरून दादा-शिंदेंमध्ये पडद्यामागे संघर्ष, अजित पवारांच्या अर्थ खात्यावर शिवसेनेचा वॉच? मंत्रालयात नेमकं घडलं काय?

| Updated on: Jun 24, 2025 | 6:59 PM

अजित पवार यांच्यावर शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी कायम आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर शिंदेंच्या सोबतच्या बैठकीमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांकडूनही नाराजी व्यक्त केल्याचही कळतंय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मंत्रालयामध्ये बैठक पार पडली. अजित पवार यांच्या निधी वाटपावर वॉच ठेवा अशा सूचना शिंदेनी आपल्या मंत्र्यांना दिल्यात असं कळतंय. अजित पवार त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनामध्ये गेले होते.

निधीवाटपावरून मंत्रालयात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात मोठ्या घडामोडी घडल्याचे पाहायला मिळालं. तर निधीवाटपावरून एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. निधी वाटपावरूनच अजित पवार शिंदेंच्या भेटीला त्यांच्या दालनात गेले. या आधी शिंदेंच्या मंत्र्यांनी शिंदेंकडे निधी वाटपावरून दादांची तक्रार केली होती.

तक्रारीनंतर शिंदेनी मंत्र्यांना दादांच्या निधीवर वॉच ठेवा असं सांगितल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या खात्यामध्ये 14-14 हजार कोटींच्या दोन निधींवर शिंदेनी लक्ष ठेवण्यास सांगितल्याची माहिती आहे. जे हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे, असा शिंदेंचा आग्रह आहे. त्यामुळे यापुढे अजित दादांच्या अर्थ खात्यावर शिवसेनेचा वॉच असेल अशी चर्चा आहे.

मंत्र्यांच्या बैठकीनंतर शिंदेंचे मंत्री उदय सामंत दादांना जाऊन भेटले. या बैठकीनंतर दादा स्वतः शिंदेंना भेटायला त्यांच्या दालनात आले. याआधीसुद्धा शिंदेंचे मंत्री आणि दादा यांच्यामध्ये निधी वाटपावरून संघर्ष उघड झाला आहे. मी पैसे खिशात घेऊन फिरतो का? असं अजित पवारांनी निधीवरून याआधी म्हटलं होतं. भाजपच्या आमदारांनी सुद्धा निधी वाटपावरून दादांची तक्रार थेट शहांकडे केली होती. निधीवरून दादा-शिंदेमध्ये पडद्यामागे मोठा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे.

Published on: Jun 24, 2025 06:59 PM