Shahajibapu Patil Video : उद्धव ठाकरे भविष्यात एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू पाटलांचं मोठं भाकीत
शिवसेनेतील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 'एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरे हेच उद्धव ठाकरे यांना सोडायची भाषा करतील', असं भाकितच आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर बोलताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरे हेच उद्धव ठाकरे यांना सोडायची भाषा करतील’, असं भाकितच आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहण्यात काही अर्थ नाही हे कार्यकर्त्यांना कळून चुकले असल्याचे म्हणत आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘कोणत्याही चौकशीमुळे कोण पक्षात येत नसतं. छगन भुजबळ, संजय राऊत यांच्यावर चौकशी होती त्यांनी पक्ष सोडला का?’, असा सवालही शहाजीबापू यांनी केलाय. पुढे ते असेही म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची परिस्थितीच अशी झाली आहे की, तिथे थांबण्यात काही अर्थ नाही अशी भावना कार्यकर्त्यांची झाली. एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरे हेच उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा करतील, असं जिव्हारी लागणारं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केलंय. तर यावर विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केलाय. ‘शहाजीबापूंची झाडीही गेली आणि डोंगरही गेला आता ते उजाड रानावर आहेत’, अशी जहरी टीका वडेट्टीवार यांनी केली.
