Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपुरात तांत्रिक बिघाड झाला. कार्तिकी यात्रेच्या तयारीची पाहणी करून मुंबईला परतत असताना ही घटना घडली. हेलिपॅडवरच हेलिकॉप्टर सुरू होऊन अचानक बंद पडले. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुख यांच्यासह प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, पुढील निर्णयासाठी चर्चा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपुरात तांत्रिक बिघाड झाल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कार्तिकी यात्रेच्या तयारीची पाहणी करून मुंबईला परतत असताना ही घटना घडली. उपमुख्यमंत्री शिंदे आज दुपारी पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते.
पाहणी दौरा आटोपल्यानंतर हेलिकॉप्टरने मुंबईकडे परतण्याची तयारी करत असताना, हेलिपॅडवरच हेलिकॉप्टर सुरू होऊन अचानक बंद पडले. पायलटने तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितल्यानंतर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ अलर्टवर आल्या. जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी आणि काही आमदार घटनास्थळी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनीही बिघाडाची माहिती घेतली. पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्थेबाबत किंवा अन्य निर्णयाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे प्रशासकीय पातळीवर मोठी धावपळ सुरू झाली आहे.
