Karad Rescue Operation | कराडमध्ये पुरात अडकलेल्यांच्या बचावकार्याचा Exclusive Video

| Updated on: Jul 28, 2021 | 10:30 AM

गावाबाहेर पडण्याचे बंद झालेले मार्ग, खंडीत वीजपुरवठा, नॉट रिचेबल मोबाईल आणि घरात लागलेले पाण्याचे उमाळे अशा कठीण परिस्थितीत संपर्कहीन झालेल्या धनावडेवाडीकरांनी आज पावसाची उघडीप मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या मदतीने तुटलेल्या पुलाला शिड्यालावून आणि छाती एवढ्या पाण्यात मानवी साखळी तयार करुन नदी ओलांडली.

Follow us on

मराठवाडी धरणाच्या जलाशयापासूनच लगतच डोंगराच्या कुशीत जितकरवाडी, शिंदेवाडी, धनावडेवाडी या छोट्याशा वाड्या वसलेल्या आहेत. यापैकी जितकरवाडी लगतचा डोंगर घसरुन दरड कोसळू लागल्याने दोनच दिवसांपूर्वी तेथील 23 कुटुंबातील 93 जणांना सुरक्षेच्या कारणास्तव जिंती येथील विद्यालयात हलविण्यात आले. जितकरवाडी जवळच ओढ्यापलीकडे असलेल्या निगडे ग्रामपंचायतीच्या कक्षेतील धनावडेवाडी आणि शिंदेवाडी परिसरातही डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील ग्रामस्थांच्या काळजाचा ठोकाच चुकला. गावाबाहेर पडण्याचे बंद झालेले मार्ग, खंडीत वीजपुरवठा, नॉट रिचेबल मोबाईल आणि घरात लागलेले पाण्याचे उमाळे अशा कठीण परिस्थितीत संपर्कहीन झालेल्या धनावडेवाडीकरांनी आज पावसाची उघडीप मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या मदतीने तुटलेल्या पुलाला शिड्यालावून आणि छाती एवढ्या पाण्यात मानवी साखळी तयार करुन नदी ओलांडली.