Thackeray Sena: ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, संजय राऊत यांनी सांगितलं कारण

| Updated on: Dec 25, 2025 | 1:46 PM

विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून, ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. नाशिकमध्ये त्यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आमदार देवयानी फरांदे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रवेश होऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याने भाजप कार्यालयाबाहेर मोठा तणाव निर्माण झाला आहे.

विनायक पांडे आणि यतिन वाघ यांना ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. हे दोन्ही नेते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, नाशिकमधील या प्रवेशामुळे भाजपमध्येच अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. नाशिकमधील भाजप कार्यालयाबाहेर या प्रवेशाविरोधात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी पांडे आणि वाघ यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आमदार देवयानी फरांदे यांनीही हा प्रवेश कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयारी करायला लावून ऐनवेळी बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. सध्या भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Published on: Dec 25, 2025 01:46 PM